ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगांव संरक्षण उत्पादनात अग्रेसर तिन्ही कामगार संघटनांचे पत्रक
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मागील तीन चार वर्षांपासून एम आय एल ग्रुप मध्ये उत्पादनाच्या बाबतीत आयुध निर्माणी वरणगांव चे नाव सर्वात खाली म्हणजे दहा नंबर वर होते. मुख्य महाप्रबंधक राकेश ओझा यांनी आयुध निर्माणी वरणगांव मध्ये पदभार स्विकारला व लगेच महेश शिंदे, संयुक्त महाप्रबंधक यांना प्रोडक्शन ची जबाबदारी सोपवली. मुख्य महाप्रबंधक यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांना विश्वासात घेऊन अनेक धडाडीचे निर्णय घेतले.
एप्रिल महीन्यापासुनच ५४ घंटे ओव्हरटाईम प्रत्येक सप्ताह मध्ये सुरु असुन अल्पावधीतच या फॅक्टरी चे प्रोडक्शन ३००% वाढवून जे टारगेट वर्षभरात होत होते ते पाच महिन्यातच ३०० कोटीचे उत्पादन लक्ष्य प्राप्त झालेले आहे. त्यापैकी २४४ कोटीचा माल स्थल सेना , नौसेना व वायुसेना व गृह मंत्रालया अंतर्गत पोलीस दलांना पाठवण्यात आला आहे.यामुळे आयुध निर्माणी वरणगाव या पाच महिन्यातच एम.आय.एल. ग्रुप मध्ये एक नंबर च्या स्थानावर पोहोचली आहे.हे सर्व मुख्य महाप्रबंधक राकेश ओझा व प्रोडक्शन अधिकारी महेश शिंदे यांच्या धडाडीच्या निर्णय व कर्मठ कर्मचाऱ्यांच्या व अधिका-यांच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. इथेच न थांबता “अबकी बार १००० करोड पार” असा संदेश व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे. तो यावेळेस निर्माणी नक्की हा पल्ला गाठेल असा विश्वास निर्माणीतील कामगार , इंटक व भारतीय मजदूर संघ अश्या तिघी संघटनांच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे. म्हणून तिन्ही संघटनेने या ऐतिहासिक उपलब्धीसाठी मुख्य महाप्रबंधक व प्रोडक्शन अधिकारी, सर्व कर्मचारी व अधिका-यांचे अभिनंदन व कौतुक केलेले आहे.