Thursday, November 21, 2024
Homeजळगावअंतर्नाद प्रतिष्ठानची शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा यशस्वीपणे संपन्

अंतर्नाद प्रतिष्ठानची शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा यशस्वीपणे संपन्

अंतर्नाद प्रतिष्ठानची शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा यशस्वीपणे संपन्

२४३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

भुसावळ ( प्रतिनिधी) भुसावळमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळेत २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून सुंदर गणेश मूर्ती साकारल्या. मातीचे भिजवलेले गोळे विद्यार्थ्यांना अंतर्नाद तर्फे मोफत देण्यात आले होते.

 


कार्यशाळेचे उदघाटन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी आणि उदयोजक श्याम दरगड यांच्या हस्ते गणपतीची आरती करून करण्यात आले. कलाशिक्षक हितेंद्र नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणेशाच्या सुबक मूर्ती बनवल्या.
कार्यशाळेचा प्रमुख उद्देश पर्यावरण संरक्षण आणि जलाशयांचे प्रदूषण टाळण्यासाठी शाडूमाती गणेश मूर्तींचा प्रसार करणे हा होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे वचन दिले.

 


प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे, समन्वयक उमेश फिरके, सह-समन्वयक विपिन वारके, उपक्रम समिती सदस्य ज्ञानेश्वर घुले अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला.या उपक्रमाच्या माध्यमातून “शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करु या!”
हा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या