Sunday, November 24, 2024
Homeजळगावमोक्षाचा समान अधिकार देणारे ज्ञात संत म्हणजे श्री चक्रधर स्वामी - श्रीविष्णू...

मोक्षाचा समान अधिकार देणारे ज्ञात संत म्हणजे श्री चक्रधर स्वामी – श्रीविष्णू प्रसाद शास्त्री

मोक्षाचा समान अधिकार देणारे ज्ञात संत म्हणजे श्री चक्रधर स्वामी – श्रीविष्णू प्रसाद शास्त्री

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वैदिक परंपरेला नाकारून मोक्षाचा समान अधिकार देणारे थोर समाज सुधारक संत महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या जीवनीतून सर्वांग सुंदर, आदर्श आयुष्य कसे जगावे याचा परिपाठ संपूर्ण मानव जातीला दिला असून त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचे भाग्य आपणास लाभत असल्याचे मनोगत श्रीविष्णू प्रसाद शास्त्री यांनी व्यक्त केले.ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतरण व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्म दिनी म्हणजेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे हे होते तर उपप्राचार्य डॉ एस व्ही जाधव, उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील यांच्यासहित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांनी श्री चक्रधर स्वामी यांचे जीवन चरित्र उलगडून त्यांनी मानव जातीला मोक्षप्राप्तीचा मार्ग साध्या, सरळ, सोप्या शब्दात लीळाचरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून दिला. संपूर्ण मानव जातीचे आयुष्य आनंदमय व मोक्ष प्राप्तीचे ईप्सित साध्य करून घेण्यासाठीच आहे. त्यासाठी श्री चक्रधर स्वामी हे आदर्शच आहेत असे उद्गार यावेळी त्यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन छाया शिरसाळे या विद्यार्थिनींने केले तर आभार रोहिणी यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या