इलेक्ट्री तार चोरट्यांवर पारोळा पोलिसांची कारवाई ! गोपनिय माहितीच्या आधारे लागला सुगावा
पारोळा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी गोपानीय माहितीच्या आधारे ईलेक्ट्रीक तार चोरी करणाऱ्या चोरांना सापळा रचुन पारोळा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांनी कारवाई केली .
पारोळा तालुक्यातील सांगवी गाव शिवारात महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाच्या ईलेक्ट्रीक प्रवाह करणाऱ्या पोलवरील अॅल्युमिनीयम तार चोरी करणारी टोळी संशयीतरित्या फिरत असलेबाबत माहीती प्राप्त झाल्याने सदर बाबत खात्री करणे कामी तात्काळ पोउनि राजु विठ्ठल जाधव, पोहेको ४१८/सुनिल हाटकर, पोहेकौं २७१८/प्रविण पाटील, पोकौं ८५०/अशिष गायकवाड, पोकों योगेश शिंदे, पोका चा अनिल वाघ अशांना सरकारी वाहनाने रवाना केले असता सदर परिसरात नमूद पथकास ईसम नामे समाधान नारायण पाटील रा-एरंडोल हा चार चाकी काळी-पिवळी टॅक्सी हिचे सह सांगवी ता. पारोळा गावाचे शिवारात इले.डी.पी. जवळ मिळुन आला त्याचे कडेस अधिक चौकशी केली असता तो उडवा उडविची उत्तरे देत असल्याने त्याचे कब्जात एक तार कापण्याची पक्कड मिळुन आली त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्याने माझ्या सोबत रविंद्र अनिल मिस्तरी रा-साईनगर एरंडोल, व धनराज प्रकाश ठाकुर रा-अमळनेर दरवाजा एरंडोल असे दोन जण असुन ते पळुन गेले आहे. असे सांगीतले नमुद ईसमास अधिक चौकशी कामी पो स्टे येथे आणुन त्याचे दोन साथीदार यांच्या वर नमुद पोलीस पथकाने तात्काळ अंत्यंत शिताफीने शोध घेवुन ताब्यात घेतले व पो स्टे ला आणुन त्यांचे कडेस अधिक चौकशी करता वरील तिन्ही आरोपीतांनी पारोळा पो स्टे हद्दीत दोन वेग वेगळया ठिकाणी व एरंडोल पो स्टे हद्दीत तीन वेग वेगळया ठिकाणी ईलेक्ट्रीक अॅल्युमिनीयम तार चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याबाबत पारोळा पो स्टे कडील दोन वेग वेगळे गुन्हे व एरंडोल पो स्टे कडील तीन वेग वेगळे गुन्हे उघकीस आले आहे.
सदर कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेडडी पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, मा सुनिल नंदवाळकर उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.