Friday, November 22, 2024
Homeजळगावरावेरात ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा

रावेरात ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा

रावेरात ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा
रावेर : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
ऑनलाइन जुगाराचे मोबाइल अॅप बनवून शहरातील सुमन नगरमधील एका घरातून चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरद्वारे गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवले जात होते. तसेच ऑनलाइन जुगार खेळला जात होता. याची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हरयाणातील तरुणी रावेरमधील सुंदर नगरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यात पोलिसांनी अधिक चौकशी केली आणि हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात वावरणारी अनोळखी हरयाणातील युवती कोण आहे? व नेमकी कशासाठी वावरतेय? ही बाब पोलिसांच्या नजरेत आली. तपास केला असता दि. २४ रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्टेशन रोडवरील सुमन नगर येथील एका घरात ऑनलाइन बेटिंग सुरू असल्याचे कळले.
पोलिसांच्या पथकाने छापा मारला आणि आरोपी अभिषेक अनिल बानिक (वय १९, रा. मनिषनगर, नागपूर), साहिल खान वाकिल खान (वय २२, रा. पंधाना, जि. खंडवा, म.प्र.), बलवीर रघुवीर सोलंकी (वय २२, रा. जावलता. जि. खंडवा, म.प्र.), औंकित धर्मेंद्र चव्हाण (वय १९, रा. पंधाना, जि. खंडवा, म.प्र.), साहिद खान जाकिर खान (वय १९, रा. खडकवाणी, ता. कसरावद, जि. खंडवा, म.प्र.), गणेश संतोष कोसल (वय २५, रा. ता. पंधाना, जि. खंडवा, म.प्र.) हे सात जण वेबसाईटवर व्हॉट्सअॅपद्वारे लिंक पाठवून जुगार खेळताना आढळले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या