भुसावळ तालुक्यातील साकेगावात रात्रीच्या सुमारास महिलेवर चाकूने वार करीत खून !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ भांडणाच्या कारणावरुन सोनाली महेंद्र कोळी या महिलेवर सागर रमेश कोळी (वय २८) याने चाकूने वार करीत खून केला. ही घटना भुसावळ तालुक्यातील साकेगावात बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे सोनाली महेंद्र कोळी ही महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास महिलेचे गावात राहणारा सागर रमेश कोळी याच्या सोबत भांडण झाले. या आरोपी सागर कोळी भांडणाच्या रागातून सागर कोळी याने हातात असलेला चाकूने पाठीवर पोटावर वार करून सोनाली कोळी यांचा खून केला. तसेच दोघांचे भांडण सुरू असताना विनोद सुभाष कुंभार हा तरुण भांडण सोडवण्यासाठी आला असता. त्याच्या हातावर देखील वार करून तो आमच्या मधात येऊ नकोस नाहीतर तुला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ माजून गेली होती.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि पथक घटनांसाठी दाखल झाले.
दरम्यान, मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे रवाना करण्यात आला. गुरुवारी पहाटे संशयित सागर रमेश कोळी याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहे.