Friday, November 22, 2024
Homeगुन्हा१० हजारांची लाच घेताना सरपंचासह पंटरला रंगेहाथ अटक !

१० हजारांची लाच घेताना सरपंचासह पंटरला रंगेहाथ अटक !

१० हजारांची लाच घेताना सरपंचासह पंटरला रंगेहाथ अटक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आवास योजनेत मंजूर घरकूल नावावर करण्यासाठी लाभार्थ्याकडून १० हजारांची लाच घेताना खडकदेवळा, ता. पाचोरा येथील सरपंच व त्याच्या पंटरला रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. खडकदेवळा येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (४६) आणि त्याचा पंटर बलराम हेमराज भिल (४६, रा. खडकदेवळा बु. ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहे. त्यांचे आवास योजनेतंर्गत घरकूल मंजूर झाले होते. परंतु ते राहत असलेल्या जागेला नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यात आलेले नव्हते. ते काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. दहा हजारांची ही रक्कम सरपंचाने पंटरकडे देण्यास सांगितले. शुक्रवारी दुपारी ही रक्कम पंटरकडे देताच पथकाने त्याला अणि नंतर सरपंचालाही अटक केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या