यावल न.प.पाणीपुरवठा अभियंता यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी केली शिवरत्न फाउंडेशनने.
यावल दि.५ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्या विरोधात शहरातील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोटी तक्रार दिली त्याबाबत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी असा लेखी अर्ज येथील शिवरत्न फाउंडेशन श्री छत्रपती ग्रुपने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिला.
दि.४ ऑक्टोंबर २०२४ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की यावल नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्या विरोधात यावल शहरातील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे,त्या तक्रारीची
सखोल चौकशी केल्यास त्यात सत्य काय..? आणि खोटे काय..? समोर येईल.तसेच सत्यम
पाटील यांच्याकडे शहरातील सामान्य नागरिकांनी कधीही कामा विषयक संपर्क केला असता त्यांनी त्या नागरीकाची कामे लगेच मार्गी लावली आहेत.त्यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीत त्यांच्या
नगरपालिकां ऑफीसमधील कर्मचारी व सत्यम पाटील यांच्यात अंतर्गत मतभेदातून वाद आहे असे हे राजकीय कार्यकर्ते म्हणतात,त्या बाबतीत नगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने त्यांच्या विरोधात आज पर्यंत लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही.तसेच शहरात काही दिवसापुर्वी गणपती विसर्जन व ईद मिलनाचा कार्यक्रम होता या दरम्यान शहरात कुणाचीही तक्रार नसतांना त्यांनी मुस्लीम
वस्तीत लावलेला ध्वज उतरवला होता त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता असे तक्रारीत म्हटले आहे पण त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार
यावल पोलीस प्रशासनाला ज्ञात आहे. ( ध्वज बेकायदा होते की अधिकृत हे सर्व यावलकरांना ज्ञात आहे आणि बेकायदा फलक, बॅनर,झेंडे,यांच्यावर कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा आहेत ) तसेच त्यादिवशी घडलेल्या प्रकाराची सत्यता पडताळण्यात यावी.तसेच त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी तक्रार दाखल केली आहे त्यांच्या पैकी एका पदाधिकाऱ्याच्या विरोधात त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यानी व नागरीकांनी हा पदाधिकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल कसा करतो तो सांगेल त्या पध्दतीने अनधिकृत / नियमबाह्य कामे करा नाहीत तर तुम्हाला बघुन घेईल अशी धमकी
अधिकाऱ्यांना देतो अश्या स्वरूपाची लेखी तक्रार त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे त्याची प्रत आम्ही या निवेदना सोबत जोडत देत आहे.
तसेच आज रोजी नगरपालिकेत एकही कायमस्वरूपी अधिकारी नाही त्याठिकाणी मुख्याधिकारी, बांधकाम अभिंयता,विद्युत अभियंता,लेखापाल,अशा अनेक
प्रकारचे महत्वाचे अधिकारी नाहीत फक्त एकच पाणी पुरवठा
अभियंता त्याठिकाणी कार्यरत आहेत.व नगरपालिका संबंधित विविध विषयाचे प्रश्न समस्या त्याठिकाणी सोडवत आहेत.
त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांना आमचे यावल शहरातील नागरीकांची अशी मागणी की अशा कार्यतत्पर अधिकाऱ्या विरुद्ध दिलेल्या खोट्या तक्रारीची
चौकशी करावी व खोट्या तक्रारी करणाऱ्या व अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या त्या
राजकीय कार्यकर्त्यावर कारवाई करावी अशी मागणी वजा अर्ज केला आहे.दिलेल्या अर्जावर शिवरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माळी,सचिव सागर कृष्णा लोहार,सागर कोळी,किरण भोई,
यश कोलते,विजय कोळी,राहुल झांबरे,भरत भोई,अरुण सावकारे,
निखिल माळी,ऋषिकेश कोळी,
गोलू भोई,सचिन कोळी,राकेश शिर्के,लोकेश फेगडे, उमेश कोळी, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मागासवर्गीय यावल शहर अध्यक्ष कामराज घारू यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती व स्वाक्षरी आहे .
याच प्रकारे खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी दुसऱ्या अर्जावर कंत्राटी कामगार सागर शिवाजी कोळी,भरत संतोष भोई,सागर लोहार,विजय भोई,किरण भोई, प्रकाश शिंदे,शुभम पाटील,विजय कोळी,भरत बारेला,सचिन फालक, आकाश धनगर,राहुल झांबरे,हेमंत फेगडे यांनी स्वाक्षरी करून खोटी तक्रार करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.