Tuesday, December 3, 2024
Homeजळगावकवित्री बहिणाबाई विद्यापीठाकडून हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

कवित्री बहिणाबाई विद्यापीठाकडून हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

कवित्री बहिणाबाई विद्यापीठाकडून हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

८ ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू.

यावल दि.६ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी परीक्षा २ दिवसावर आली असली तरी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी म्हटले आहे.

कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा मंगळवार दि.८ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होत आहे,परंतु त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र हॉल तिकीट अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले नसून विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड होत नाही पर्यायी या परीक्षा प्रक्रियेत कॉलेज महाविद्यालय विद्यापीठ प्रशासनाची चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते त्यात त्यांचे शैक्षणिक, आर्थिक,
मानसिक सर्वच प्रकारचे नुकसान झाल्यास त्या महाविद्यालय व विद्यापीठ कारणीभूत राहील यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ( अजित दादा गट ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांशीव विद्यापीठाच्या वेबसाईटवर ई-मेलवरून विद्यापीठात तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र मिळवून देणे आवश्यक आहे अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानास विद्यापीठ जबाबदार राहील यावल तालुका हा सातपुडा च्या पायथ्याशी येत असल्याने यात दुर्गम भागातून विद्यार्थी या परिसरात प्रवेश घेतात व त्यांना प्रवेश पत्रच उशिरा मिळाले किंवा न मिळाल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते याची दखल घेत राकेश सोनार यांनी यावल यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्याशी संपर्क करून विद्यापीठात पाठपुरावा करण्याची विनंती केली तसेच स्वतः देखील कुलगुरू उप कुलगुरू कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी ईमेलच्या माध्यमातून तक्रार देखील केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या