Thursday, November 21, 2024
Homeजळगावभुसावळात महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक 

भुसावळात महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक 

भुसावळात महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ विधानसभा मतदारसंघात महा विकिस आघाडीच्या घटक असलेल्या राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) पक्षाला सुटणारी जागा वरीष्ठांच्यां राजकिय गणितांनुसार कॉग्रेस पक्षाकडे देण्यात आली असुन डॉ. राजेश मानवतकर यांना उमेदवारी निश्चीत केली आहे. त्या दृष्टीने स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवार ता. २७ मानवतकर हॉस्पीटल येथे बैठकीचे आयेजन केले होते.प्रसंगी बैठकीतइंडिया बहुजन विकास पार्टीचे अध्यक्ष मोहन निकम, माजी आमदार दिलीप भोळे, डॉ. जगदीश पाटील (निरीक्षक) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पवार राष्ट्रवादी पक्षाचे राजेंद्र चौधरी तसेच शिवसेना (उबाठा ) व भीमशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
भुसावळ विधानसभेत अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहिर झाल्याने महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेश मानवतकर हे आमदारकी साठी पहिल्यांदा आपले नशीब आजमावुन पाहत असले तरी मागील २०१९ च्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकी मध्ये त्यांच्या पत्नी डॉ. मधु मानवतकर यांनी अपक्ष निवडणूक लढऊन २८ हजार मते घेतली आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडितील कॉग्रेस घटक पक्षश्रेष्ठीनी त्यांचा विचार करून डॉ. राजेश मानवतकर यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. मात्र कॉग्रेस पक्षातील ८ ते १० इच्छुक असतांना डॉ. मानवतकर यांना उमेदवारी मिळाली आहे.मात्र महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांत उमेदवारीसाठी संघर्ष सुरू होता. अखेर ती जागा काँग्रेस पक्षाला मिळविण्यात यश आले आहे. कॉग्रेसमध्ये सुध्दा नऊ दावेदार होते. परंतु डॉ.राजेश मानवतकर यांचे पारडे जड ठरले. डॉ. राजेश मानवतकर हे पहिल्यांदा विधानसभेच्या रींगणात आहेत. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या पत्नी डॉ.मधु मानवतकर यांनी अपक्ष असतां आमदार संजय सावकारे यांच्या विरूध्द २८ हजार मते मिळवुन दुसऱ्या क्रमांकावर होत्या. तर डॉ. राजेश मानवतकर भुसावळ मध्ये प्रसिद्ध डॉक्टर असुन ते हृदयरोग तज्ञ आहेत त्यांचा संर्पक मतदारसंघात सर्व समाजातील लोकांसोबत असुन आणि नवखा चेहरा असल्याने महाविकास आघाडी तर्फे
डॉ.राजेश मानवतकर यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे. त्या दृष्टीने रविवार ता. २७ रोजी भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दुपारी १.०० वाजेला विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक संपन्न झाली.

विधानसभा निवडणूका सुरू झालेल्या असतांना शहरातील खड्डेमय रस्ते, रखडलेली अमृत योजना, एमआयडीसी मध्ये उद्योग नाही त्यामुळे बेरोजगारी, आठ दहा दिवसाआड होणारा पाणी पुरवठा शहरातील वाढती गुन्हेगारी यासारख्या गोष्टी त्यांना त्रासदायक ठरू शकतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीराम पाटील यांना ६८ हजार ३९ मते मिळाली होती त्या मतांचा प्रभाव विधानसभेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दि.२७ रोजी दुपारी १.०० वाजेला विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी व मित्रपक्षांची बैठक संपन्न झाली. विधानसभा निवडणूका सुरू झालेल्या असून भुसावळ विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आल्याने महाविकास आघाडी तर्फे नैवखा चेहरा डॉ. राजेश मानवतकर यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे.
भुसावळ विधानसभेची उमेदवारी डॉ. राजेश मानवतकर यांना दिली असुन. मंगळवार ता.२९ रोजी डॉ. राजेश मानवतकर आपले नामांकन अर्ज सकाळी १०.०० वाजेला भरणार असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिरा जवळ उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सदरील रॅली ही अष्टभुजा मंदिराजवळून निघणार आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.सर्व कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून एकजुटीने काम करायचे आहे. उमेदवाराला बूथ, कमेटी तसेच पदाधिकाऱ्यांनी एकत्र यायचे आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधी, शरदचंद्र पवार तसेच उद्धव ठाकरे ही नेते मंडळी व तिघ पक्ष कधीही एकत्र येणारे नव्हते मात्र लोकशाही वाचवण्यासाठी हे सर्व एकत्र आले त्याप्रमाणे सर्वांनी एकजुटीने आपण स्वतः उमेदवार आहात असे भासवून काम करायचे आहे. जनतेचे, आरोग्याचे, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की विधानसभेत परिवर्तन करीत नव्या चेहऱ्याला विधानसभेत पोचवायचे आहे. असे बैठकीत ठरले.कार्यक्रमाचे आभार प्रा. जतीन कुमार मेढे यांनी मानले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या