केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या होती उपस्थिती!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे विद्यमान आमदार संजय वामन सावकारे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला आहे.
सोमवार २८ रोजी सकाळी जामनेर रोडवरील दर्डा भवन येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपाच्या संर्पक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, डॉ. केतकी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेश नेमाडे यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामनेर रोडवरील भाजपाच्या संपर्क कार्यालयापासून शक्ती प्रदर्शन करीत, प्रांत कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. २२ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली. २९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या अनुशंगाने सर्वांचे लक्ष लागलेल्या भुसावळ विधानसभा मतदार संघात सोमवार २८ रोजी विद्यमान आमदार संजय वामन सावकारे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत भुसावळ विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपाचे आमदार संजय वामन सावकारे यांच्या संर्पक कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत भुसावळ मधुन चांगला लिड मिळाला होता तसाच लिड विधानसभा निवडणुकीत देऊन आमदार संजय सावकारे यांना बहुमताने विजयी करा.
आमदार संजय सावकारे यांच्या समोर पाहिजे तेवढा तगडा उमेदवार नाही असे हि रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. तर गिरीश महाजन यांनी आमदार संजय सावकारे हे चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवीत आहे ते नक्कीच चौकार ठोकून विजय होतील असा विश्वास व्यक्त केला पुढे ते म्हणाले की भाजपामध्येच भाजपाच्या कोणत्या उमेदवाराला जास्तीची मते मिळतील अशी स्पर्धा सुरू आहे. मला देखील थोडीफार मते मिळतील असा उपरोधिक टोला त्यांनी यावेळी लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष रमन भोळे यांच्या सहअनेकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.