Thursday, November 21, 2024
Homeभुसावळभुसावळात ३ दिग्गजांचे शक्ति प्रदर्शन करीत दाखल केले नामांकन अर्ज

भुसावळात ३ दिग्गजांचे शक्ति प्रदर्शन करीत दाखल केले नामांकन अर्ज

भुसावळात ३ दिग्गजांचे शक्ति प्रदर्शन करीत दाखल केले नामांकन अर्ज 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर राजेश मानवतकर यांनी मंगळवार दिनांक २९ रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर वंचित कडून जगन सोनवणे यांनी अर्ज दाखल केला असून अपक्ष म्हणून प्रीती महाजन यांनी अर्ज दाखल केला आहे हे तिन्ही उमेदवार दिग्गज असल्याचे समजते .शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासुन डॉक्टर राजेश मानवतकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्यासह शक्ती प्रदर्शन करत रॅली काढुन प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जामनेर रोडवरील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास तसेच यावल रोडवरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.यावेळी महाआघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्या उपस्थित होते. डॉ . राजेश मानवतकर यांनी दोन नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना डाॅक्टर राजेश मानवतकर म्हणाले की पंधरा वर्षापासून भुसावळकरांचे जीवन खडतर झाले आहे.आम्हाला भुसावळ बदलवायचे आहे त्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे मानवतकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपल्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली पाहिजे. त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले असतील पण ती नाराजी फक्त फॉर्म भरणे पर्यंत असावी. एकदा फॉर्म भरल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. तुम्हाला जर खरोखरच भुसावळ शहराची परिस्थिती बदलायची असेल शहरात शांतता, सुरक्षितता, रोजगाआणायचा असेल तर भुसावळला नवीन चेहरा द्यायला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे .माझी लढाई भुसावळ मधल्या अनिष्ट गोष्टीशी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
२९ आॅक्टोबर नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जगन सोनवणे यांनी देखील शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भावी आमदार म्हणून त्यांचा परिचय तालुक्याला आहे. तसेच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रतिभा जगदाळे यांच्या सह इतर उमेदवारांनी देखील नामांकन अर्ज दाखल केले आहे. यामध्ये भारतीय काँग्रेस कडून निवडणूक लढवु इच्छित असणाऱ्या प्रिती चव्हाण महाजन यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या