फैजपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेची महायुतीकडून जय्यत तयारी.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जळगाव जिल्ह्यात येत असल्याने प्रशासन सज्ज.
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनहिताच्या योजना व राष्ट्र हिताचे कार्य लक्षात घेता सर्व स्तरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महाराष्ट्रात सर्वात जास्त महायुतीचे उमेदवार निवडून येतील व परत महायुतीची सत्ता येईल अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री खा.रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री जळगाव जिल्ह्यात येत असल्याने शासकीय यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे.
काल शुक्रवार दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी फैजपूर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची रविवार दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी फैजपूर येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मैदान, फैजपूर- हबर्डी तथा फैजपूर यावल रोडवर म्हणजे बऱ्हाणपूर- अंकलेश्वर हायवे साखर कारखान्या जवळ जाहीर प्रचार सभा होणार आहे.पत्रकार परिषदेत केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री खा.रक्षा खडसे या पुढे म्हणाल्या की,विधानसभा निवडणुकीत आपल्या जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत सर्व स्तरातून महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने सर्व स्तरातील स्री,पुरुष, लाडक्या बहिणींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आगामी वर्षात काळा केंद्र शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे होणार असल्याचा आत्मविश्वास नागरिकांना असल्याने. नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघता महाराष्ट्रात सर्वात जास्त संख्येने महायुतीचे उमेदवार निवडून येतील व परत महायुतीची सत्ता येईल.
भारतीय जनता पार्टीला रावेर लोकसभा निवडणुकीत यश आले त्याचप्रमाणे रावेर विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळेल असाआत्मविश्वास खासदार रक्षाताई यांनी व्यक्त केला आहे.पत्रकार परिषदेला राज्यसभा खा.बन्सीलाल गुजर,डॉ.कुंदन फेगडे,डॉ.राधेश्याम चौधरी,शरददादा महाजन,पांडुरंग सराफ,विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपूत,सुरेश धनके,गणेश नेहते, भरत महाजन,संदीप पाटील, हरलाल कोळी,उमेश फेगडे,राजन लासुरकर,आरपीआयचे विष्णू पारधे,अंकुश महाराज,शहराध्यक्ष पिंटू तेली,संजय सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.