गृहमंत्री अमित शहा फैजपुरात येऊन गेल्याने संपूर्ण मतदारसंघात महाविकास आघाडीत एकाच दिवसात समयसूचकता झाली निर्माण !
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – काल रविवार दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी महायुतीचे भुसावळ येथील उमेदवार गिरीश महाजन, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, रावेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल जावळे,चोपडा मतदार संघाचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रचारासाठी आले होते.त्यांनी आपल्या जाहीर भाषणातून काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केल्याने त्यांच्या भाषणाचा एक विशिष्ट अर्थ लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांसह अनेकांमध्ये तीव्र नाराजी आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त समय सूचकता निर्माण झाली आहे, रावेर विधानसभा मतदारसंघात ६० ते ६५ मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन महाविकास आघाडीला पोषक असे वातावरण तयार होऊन रावेर विधानसभा मतदारसंघात नवचैतन्य निर्माण झाले.
रावेर विधानसभेची जागा राजकीय सामाजिक दृष्ट्या महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची.
रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपाचे उमेदवार अमोल जावळे,आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी हे तरुण तडफदार तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दोघांचाही राजकीय सामाजिक वारसा लोकप्रिय असला तरी पुढील राजकीय भविष्याच्या दृष्टिकोनातून रावेर विधानसभा मतदारसंघाचे भविष्य लक्षात घेतले असता हा मतदार संघ पुढच्या पंचवार्षिकला राखीव झाल्यास या दोघांना १० ते १५ वर्ष आमदारकी पासून लांब राहावे लागेल असे स्पष्ट चित्र आणि अंदाज असल्याने आताची ही निवडणुकीत दोघांसाठी राजकीय,सामाजिक आणि रावेर विधानसभा विकासाच्या दृष्टिकोनातून फार प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची ठरणार आहे आणि याबाबतची समसूचकता मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांमध्ये निर्माण झाल्याने मतदार महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचे उमेदवार यांच्यापैकी कोणाला प्राधान्य देणार ..? किंवा या चौरंगी लढतीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो का..? हे आपल्याला लवकरच समजणार आहे.
महाराष्ट्र ‘एक’ नंबर व कसा जाणार..?
रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या १० ते १५ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा प्रभाव असताना रावेर लोकसभा मतदारसंघाचा किती प्रमाणात विकास झाला..? मधुकर कारखाना बंद का पडला..? विविध विकास योजनांच्या माध्यमातून विविध कामांमध्ये दर्जात्मक,गुणात्मक, विकास झाला का..? प्रत्यक्षात ठेकेदारांचा,पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विकास झाला का..? कामे निकृष्ट बोगस प्रतीची का झाली..? याचा आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विचार केल्यास त्यानंतर महाराष्ट्र एक नंबर वर नेण्याचा संकल्प करावा असे रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे.