रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस भाजप यांची मिलीभगत असल्याने अनिल चौधरी यांच्याकडे मतदारांचा कल!
यावल खानदेश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रावेर विधानसभा मतदारसंघाचा आणि विकासाचा गेल्या पंचवीस तीस वर्षाचा राजकीय आढावा लक्षात घेतला असता मतदार संघात ठोस जनहिताची मोठी विकास कामे पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याने तसेच लहान मोठे नवीन उद्योगधंदे न आल्याने या सर्व घटना आणि वस्तुस्थिती बाबत सत्ताधारी,
विरोधक यांची राजकीय, सामाजिक मिलीभगत असल्याने जनहिताच्या दृष्टिकोनातून किंवा विकासासाठी एकमेकांविरुद्ध कोणतेही आरोप, प्रत्यारोप झालेले नाहीत याला काय म्हणावे..? तसेच मतदार संघातील मधुकर साखर कारखाना,जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणी हे मोठे प्रकल्प बंद पडून मधुकर कारखान्याची मूल्यवान प्रॉपर्टी माती मोल भावात विक्री झाली,यावल फैजपूर नगरपालिकांची परिस्थिती काय आहे..? बऱ्हाणपूर- अंकलेश्वर म्हणजे चोपडा- रावेर या राष्ट्रीय महामार्गाची दैनावस्था कशी आहे..? हे सर्वांना माहिती आहे यामुळे भाजप- काँग्रेस दोन्ही राजकीय पक्षांबाबत मतदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून मतदारांचा कल आता निवडणूक रिंगणातील काँग्रेस पक्षाचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार दारा मोहंमद जफर मोहंमद,वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीभा भानुदास पाटील,तसेच प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार अनिल छबिलादास चौधरी यांच्याकडे झाला असून ह्या तिघं उमेदवारांमुळे महायुती आघाडी सत्ताधारी आणि विरोधक महाविकास आघाडी या दोघं उमेदवारांपैकी एकाला राजकीय फटका बसणार..!
एवढे निश्चित. माजी आमदाराच्या एका शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांने ठेकेदाराच्या माध्यमातून चाळीस लाखाच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामध्ये मोठा गैरप्रकार,भ्रष्टाचार करून मलिदा मारल्याने त्या लोकप्रतिनिधीची राजकीय पक्षाची बदनामी मोठ्या प्रमाणात होत आहे याचा विपरीत परिणाम मतदानावर होणार किंवा नाही हे लवकरच समजणार आहे, तसेच भारतीय जनता पार्टीच्या यावल परिसरातील काही पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी सुद्धा बांधकाम क्षेत्राची माहिती नसताना किंवा घरात साधे,कुदळी, पावडे,घमेली नसताना ठेकेदाराच्या माध्यमातून स्वतः प्रत्यक्ष बोगस रस्ते बांधकाम करून निधी खर्च केला.यात निधी मंजूर करणारे, आणि ज्यांनी विकास कामांचा दिंडोरा पिटला त्यांच्या नावाचा उद्धार होत असून त्यांच्याबाबत मतदारांमध्ये चर्चा आहे.यावल कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात खेडा खरेदी व टोल काट्यात 30 ते 40 किलो गारा साचतो तोपर्यंत दुर्लक्ष होते आणि शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांमार्फत लूट होते,यावल बाजार समिती कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या जागा गोदामासाठी अडकून पडलेल्या असल्याने बाजार समितीला त्याचा आर्थिक फायदा होतो किंवा नाही..? याबाबत सुद्धा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांचा वाढता प्रत्यक्ष जनसंपर्क व जनहिताची कामे व लोकप्रियता लक्षात घेता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ (अनिल चौधरी यांना ) होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार दारा मोहंमद जफर मोहंमद यांना मुस्लिम बांधवांकडून ५० टक्के आणि इतर समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला तर राजकीय पक्षाला मोठा फटका बसू शकतो असे सुद्धा बोलले जात आहे.