Thursday, November 21, 2024
Homeचोपडाधक्कादायक : निवडणूक प्रक्रिया आटोपून घरी परतणारा बीएलओ अपघातात ठार ! 

धक्कादायक : निवडणूक प्रक्रिया आटोपून घरी परतणारा बीएलओ अपघातात ठार ! 

धक्कादायक :निवडणूक प्रक्रिया आटोपून घरी परतणारा बीएलओ अपघातात ठार ! 

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील अनवर्दे – बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले तथा शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील रहिवासी व या निवडणुकीत बीएलओ असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९) यांचा निवडणूक काम आटोपून बभळाज येथील राहत्या घरी दुचाकीने जात असताना गलंगीजवळ २० रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात निधन झाले.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील अनवर्दे बुधगांव येथील लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच ठिकाणी ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ होते. तेथून निवडणुकीचे काम आटोपून ते आपल्या शिरपूर तालुक्यातील मूळ गाव बभळाज येथे परत जात असतांना त्यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्युची वार्ता समजताच ग.स.चे संचालक योगेश सनेर यांच्यासह मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली होती.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या