बॅनर फाडून दुकानदारावर धारदार शस्त्राने हल्ला
पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बॅनर फाडून दुकानदारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दि. २९ रोजी मध्यरात्री २च्या सुमारास शहरातील भुयारी मार्गालगत असलेल्या दुकानाजवळील बॅनर फाडले. त्याबाबत दुकानदार भावेश संजय पडोळ याच्याशी सूरज राजू पवार (३०, पाचोरा) व कुणाल मोरे (२९, मिलिंदनगर, पाचोरा) यांनी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच धारदार शस्त्राने पाठीवर, कानाजवळ मारहाण करीत गंभीर जखमी केले. यावरून जखमी भावेश पडोळ यांचे वडील संजय पडोळ यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.