Saturday, April 19, 2025
HomeBlogआयुष्याला समृद्ध करणारे सुसंस्कार हिवाळी शिबिरातूनच प्राप्त होतात - माजी प्राचार्य डॉ....

आयुष्याला समृद्ध करणारे सुसंस्कार हिवाळी शिबिरातूनच प्राप्त होतात – माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील

आयुष्याला समृद्ध करणारे सुसंस्कार हिवाळी शिबिरातूनच प्राप्त होतात – माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
विद्यार्थी दशेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून पुढे येत असून शैक्षणिक प्रवासासोबतच वैयक्तिक जीवनाचे उत्थान करून समाज उभारणीचे कार्य करणारे युवा हेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या यशाचे गमक आहे. ‘ नॉट मी बट यु ‘ या ब्रीद निहाय जीवनाला उच्चतम दिशा व सुसंस्काराची गाठोडी हिवाळी शिबिराच्या माध्यमातून प्राप्त होते असे मनोगत माजी प्राचार्य तथा तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर चे नियमक मंडळ सदस्य प्रा डॉ जी पी पाटील यांनी व्यक्त केले.
ते प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मोहमांडली तालुका रावेर येथे दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.
‘ युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी ‘ या विशेष थीम वर आधारित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटन समारंभाचे उद्घाटक म्हणून मोहमांडली गावाच्या सरपंच रजिया तडवी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस व्ही जाधव, उपप्राचार्य प्रा डॉ हरीश नेमाडे, उपप्राचार्य प्रा डॉ. कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ सतीश पाटील यांनी केले. त्यात विशेष हिवाळी संस्कार शिबिराची दैनंदिनी, व्यायाम, योगासने, ध्यानधारणा, यांच्यासहित स्व स्वच्छता व परिसर स्वच्छतेचे धडे, विविध विषयांवरील बौद्धिक सत्रे, विविध उपयुक्त खेळ, स्पर्धा, अंगभूत कला प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यांच्यासहित आधुनिक काळात ग्रासित करणाऱ्या मोबाईल व सोशल मीडियापासून अलिप्त राहून वाचन, सुसंवाद व चांगल्या सवयींची रुजवन करणाऱ्या शिबिराची ओळख करून दिली व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून पुढील काही दिवसात स्वयंसेवक या शिबिराच्या माध्यमातून स्वतःचे मूल्यांकन करून जीवनाच्या उच्चत्त ध्येय सिध्दी साठी सज्ज होतील असा आशावाद व्यक्त केला.
उपप्राचार्य प्रा डॉ एस व्ही जाधव यांनी मनोगतातून
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाकडून समाजाच्या सकारात्मक अपेक्षा असून स्वार्थ विरहित समर्पित वृत्तीने श्रम संस्काराचे धडे गिरवून स्वतःमधील ज्ञान कौशल्य विकसित करून समाज उपयोगी कार्य हातून घडावे व त्याच्यासाठी विशेष हिवाळी संस्कार शिबिर असून या संधीचा सहभागी सर्व स्वयंसेवकांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ पल्लवी भंगाळे व आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे यांनी केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांच्यासहित उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या