आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेअंतर्गत कौशल्य विकासावर मार्गदर्शन
यावल दि.३ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मंडळ संचलित यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा, एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर युवती सभे अंतर्गत नेतृत्व कौशल्य विकास विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कल्याणी बडगुजर ( ब्युटीशियन साकडी ) यांनी विद्यार्थिनींना नेतृत्व कौशल्य विकास या मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थिनींनी शिक्षण घेत असताना करिअर क्षेत्राकडे पण वळाला पाहिजे ब्युटीशियन हा खूप महत्त्वाचा आहे आज फॅशनेबल युगात रंग रूपाकडे मुलींना जास्त आकर्षण आहे. त्यावर खर्च पण केला जातो. परंतु रोजगाराची संदेश शोधण्यासाठी ब्युटीशियन महत्त्वपूर्ण आहे. तसेच मेहेंदी, रांगोळी,आदि कौशल्य जर अवगत केले तर कलागुणांना वाव मिळेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉ.आर.डी. पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नेतृत्व कौशल्य विकास करताना प्रथम ध्येय निश्चित केले पाहिजे.त्यासाठी जिद्द,चिकाटी
आणि मेहनत पण महत्वाची आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की कला हेच जीवन आहे.नेतृत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची इतरांना प्रेरणा देणे,संघटन करणे,आणि एखाद्या ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची क्षमता विकसित करणे,प्रथम स्वतःला ओळखणे, दृष्टिकोन आणि ध्येय, संपर्क आणि संवाद कौशल्य प्रेरणा देणे, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य,सकारात्मकता,आणि प्रेरणा निरंतर शिक्षण प्रतिकूल देशी जुळूवून घेणे,प्रामाणिकपणा,
नीतिमत्ता आणि व्यावहारिक ज्ञान या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ.वैशाली कोष्टी यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ हेमंत भंगाळे,डॉ.संतोष जाधव,
प्रा.इम्रान खान,प्रा.सुभाष कामडी,
प्रा.हेमंत पाटील,प्रा.सी.टी.वसावे, प्रा. रामेश्वर निंबाळकर,प्रा.अक्षय सपकाळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.