शासनातर्फे वितरित झालेले धान्य व्यापाऱ्यांकडून खरेदी.
यावल दि.३ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून वितरित झालेले गहू, तांदूळ,ज्वारी खाजगी व्यापारी खरेदी करतात अनेक अपात्र लाभार्थ्यांकडून.मोठे रॅकेट असल्याने चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे.
यावल तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून वितरित झालेले मोफत आणि इतर योजनेअंतर्गत मिळालेले धान्य अनेक रेशन कार्ड ग्राहकांकडून खरेदी करण्याचे मोठे रॅकेट आणि उद्योग धंदा यावल रावेर तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात सुरू असल्याने याबाबत महसूल आणि पोलीस विभागामार्फत चौकशी करून संबंधित उद्योगधंदे करणाऱ्यांना रंगेहात पकडून गुन्हे दाखल करायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.