Thursday, March 13, 2025
Homeगुन्हाअवैध गॅस भरणा केंद्रावरून ४ गॅस सिलिंडर जप्त !

अवैध गॅस भरणा केंद्रावरून ४ गॅस सिलिंडर जप्त !

अवैध गॅस भरणा केंद्रावरून ४ गॅस सिलिंडर जप्त !

एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – धरणगाव रोडलगत पत्र्याच्या शेडमध्ये वाहनात अवैधरित्या गॅस भरणा करणाऱ्या एका इसमास पकडले. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, एरंडोल येथील धरणगाव रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या विनापरवाना वाहनांमध्ये गॅसभरणा करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसोबत तातडीने याठिकाणी धाड टाकली असता तिथे मंगेश नगराज महाजन (१९, बालाजी मढीजवळ, एरंडोल) हा सापडला. दरम्यान, एरंडोलमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे तालुक्यातही अवैधरित्या वाहनात गॅस भरले जात असल्याचे उघड झाले आहे.याप्रकरणातील आरोपी मंगेश महाजन याच्याकडून ४ गॅस सिलिंडर, ४ रिकामे सिलिंडर तर सिलिंडरमधून वाहनात गॅस भरण्यासाठीचे मशीन असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाइ पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कपिलदेव पाटील, विलास पाटील, पो. ना. सचिन पाटील यांनी केली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या