यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्जलेखन स्पर्धा संपन्न.
यावल दि.१४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज लेखन स्पर्धा घेण्यात आली.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी,शासकीय नोकरीच्या संधी प्राप्त करण्यासाठी अर्ज करणे महत्त्वाचे असते त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करणे हे कौशल्य विकसित करण्यासाठी वाणिज्य व उर्दू विभागांतर्गत अर्ज लेखन स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम कु. जयश्री नारायण धनगर ( द्वितीय वर्ष कला) द्वितीय नबीला अख्तर शेख मोईनुद्दीन ( प्रथम वर्ष कला ) क्रमांकाचे मानकरी ठरले.
कार्यक्रमाला गुणलेखक म्हणून डॉ. निर्मला पवार,प्रा.इमरान खान,डॉ. संतोष जाधव,डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.सुभाष कामडी,प्रा.भावना बारी यांनी काम पाहिले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.