धनाजी नाना महाविद्यालयात कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ टीचर्स दोन दिवसीय कार्यशाळेत अनेकांनी घेतला सहभाग
फैजपूर : खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी
येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान (पीएम उषा) प्रायोजित ‘कॅपॅसिटी बिल्डींग ऑफ टीचर्स’ ही दोन दिवशीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. समारोप समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ अजय सुरवाडे संगणक प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव उपप्राचार्य डॉ. एस व्ही जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ कल्पना पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ हरीश नेमाडे, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ रवी केसुर यांच्या समवेत मोठ्या संख्येने प्राध्यापक- प्राध्यापिका उपस्थित होते.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्रा. डॉ सागर शिंदे, विभाग प्रमुख, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, पुणे यांचे ‘संशोधनाचे महत्त्व आणि प्रभावी रिसर्च पेपर लेखन’ व ‘शिक्षण आणि संशोधनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा प्रभावी वापर’ अशी दोन सत्रे झालीत. प्रा किरण जाधव, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, पुणे यांचे “ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस व प्रात्यक्षिके” व प्रा डॉ अजय सुरवाडे संगणक प्रशाळा, क ब चौ उमवि जळगाव यांचे ” ई कन्टेन्ट डेव्हलपमेंट ” इत्यादी विषयांवर प्रभावी सादरीकरणे झालीत. समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी दोन दिवशीय कार्यशाळेला यशस्वीपणे संपन्न करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांचे अभिनंदन केले आणि दोन दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयात आयोजन करण्याची सुसंधी लाभल्याबद्दल कुलगुरू डॉ. व्हि एल माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. एस टी इंगळे यांच्या समवेत संबंधित पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले. काळानुरूप अद्यावत होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या कार्यशाळा अति महत्त्वाच्या असून शिक्षकाने नेहमी नावीन्यपूर्णतेचा शोध घ्यावा व विद्यार्थ्यांना समर्पक व श्रेष्ठतम देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील व पंचक्रोशीतील महाविद्यालयांमधून आलेल्या सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, सर्व उपप्रचार्य, समन्वयक प्रा डॉ रवी केसुर, प्रा डॉ ताराचंद सावसाकडे सहित प्राध्यापक – प्राध्यापिका यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.