Saturday, April 19, 2025
Homeजळगावजंगलात पंगारा फुलला

जंगलात पंगारा फुलला

जंगलात पंगारा फुलला

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      आदिवासी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र जंगली पानझडी, सदाहरित वृक्ष वनराईने बहरलेली असल्यामुळे डोंगराळ भाग हा आजही झाडा वेलींच्या घनदाट सावलीने बहरून निघाला आहे ह्या जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि वेली औषधी वनस्पती फुल झाडं आजही मोठ्या प्रमाणात आढळतात धामोड, सादडा, साग, शिसव, शिवन, कोडई, मोह, सावर, कळंब,हुंब,पंगारा ह्या वनस्पती आजही मोठ्या प्रमाणात आढळतात पंगारा हा काटेरी पानझडी वृक्ष डोंगराळ भागात तर कुठे पडीक माळरानावर आजही मोठ्या प्रमाणात आहे शिशिर ऋतू संपूर्ण जंगलातील झाडांची पानगळ झाल्यानंतर हे झाड खराट्याप्रमाणे उघडी बोडके दिसतात अशाच विस्तीर्ण वातावरणात वसंत ऋतू पंगारा मात्र लाल रंगाच्या फुलांनी बहरून गेलेला दिसतो झाडाच्या बुंध्यापासून तर शेंड्यापर्यंत लहान लहान काटे असणारा हा वृक्ष जंगलातील रान देखाव्याप्रमाणे लाल रंगाच्या दिव्यासारखा ज्योतीने उष्ण तापमानातील गर्मीतही पेटून उठल्यासारखा भासतो माझ्याच एका कवितेत आलेली शब्द रचना अशी की
ऊन तडाख्याची वाढ
बहरं पंगाराचे झाड
फुलं उमलती लाल
मकरंद मोहित कोतवाल

ऊन पिवळा केसरी
वसंतात भरली थाळी
नभी भरती पांढरी
भुंगे विहारती रानभैरी

वसंत ऋतू पंगारा लाल फुलांनी बहरून गेलेला असतो. अशावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी फुलातील मकरंदाचा आस्वाद घेण्यासाठी झाडावर गर्दी करतात कोतवाल, सुतार पक्षी, पाकोळी हे पक्षांची जणू मेजवानीच भरते आदिवासी भागात या झाडाचे वाळलेले लाकूड अशी शिमग्याची होळी पेटवण्यासाठी वापरतात त्याला फापतर म्हणतात. हे झाड अतिशय लवचिक असल्यामुळे त्याची साल व लाकूड कोरून भुंगे घर करतात भुग्यांना आदिवासी भागात तुमसर म्हणतात ते विषारी असतात चावल्यावर माणूस बेशुद्ध पडतो आदिवासी भागात ह्या झाडाच्या सालीचा औषध म्हणून वापर केला जातो अशी माहिती आदिवासी संशोधक प्रा. सुभाष कामडी यांनी दिली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या