Saturday, April 19, 2025
Homeजळगावशिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू ; शिंदेगट शिवसेनेवर जनतेचा विश्वास वाढला !

शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू ; शिंदेगट शिवसेनेवर जनतेचा विश्वास वाढला !

शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू ; शिंदेगट शिवसेनेवर जनतेचा विश्वास वाढला !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री बाळासाहेब ठाकरे, धर्म वीर स्व. आनंद दिघे साहेब यांचे आशीर्वादाने व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना ( शिंदे गट ) पक्षप्रमुख मा. ना. श्री एकनाथराव शिंदे साहेब जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री गुलाबराव पाटील साहेब

 

Oplus_131072

मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार मा. श्री चंद्रकांतदादा पाटील तसेच रावेर लोकसभा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री समाधानभाऊ महाजन यांचे प्रेरणेने व नेतृत्वाखाली महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. नंदाताई प्रकाश निकम यांचे अध्यक्षतेखाली कळमोदा ता.रावेर येथे असंख्य स्त्री व पुरुषांचा शिवसेनेत ( शिंदे गट )जाहीर प्रवेश झाला आहे .यावरून जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत प्रवेशांची संख्या वाढल्याने इतर पक्षात खळबळ उडाली आहे .

कळ्मोदा ता: रावेर येथे काल दि. 23/03/2025 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात असंख्य स्त्री व पुरुषांनी शिवसेनेत ( शिंदे गट ) जाहीर प्रवेश केला असून याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांनी लहान वाघोदे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. पूजा तुषार कोलते यांना रावेर शिवसेना तालुका उपप्रमुख या पदी नियुक्तीचे पत्र दिले आहे. सदर कार्यक्रमप्रसंगी तालुका शिवसेना प्रमुख स्वातीताई भंगाळे, यावल तालुका प्रमुख पूजा पाटील, रावेर तालुका सरचिटणीस संगीता भंगाळे, भारती भारुळे, सावदा शहरप्रमुख वैशाली पाटील, कविता नहाले शुभांगी साळवे, संगीता पाटील, पल्लवी पाटील तसेच भगवान पाटील (रावेर यावल तालुका समन्वयक ), राजेंद्र काठोके, यावल तालुकाप्रमुख, कुणाल बांगरे रावेर विधानसभा प्रमुख, डॉ. दीपक पाटील वैद्यकीय आघाडीप्रमुख, निखिल नेमाडे, पिंटूभाऊ मंडवले फैजपूर शहरप्रमुख, राहुल पाटील सर, किशोर कापडे,

 

Oplus_131072

कैलासभाई, फकिरा वना पाटील, ई. प्रमुख अतिथी उपस्थित होते व याप्रसंगी शुभांगी सुनील काकडे, पल्लवी विष्णू पाटील, चमेली फकिरा पाटील, ज्योती राहुल पाटील, शाबीरा इनुस तडवी, सुनील प्रल्हाद काकडे, वसंत रामदास काकडे, रमेश शंकर पाटील, समाधान नामदेव पाटील, हिरामण श्रीधर बोन्डे यांसह असंख्य महिला व पुरुषांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सदर प्रसंगी महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई निकम श्री भगवान पाटील व उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेल्या लोकांना निराधार, अपंग, विधवा, वंचित ई. साठी राज्य व केंद्र शासनाने राबविलेल्या योजनांची इत्यंभूत माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या