हनी ट्रॅप खंडणी प्रकरण : महिलेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रावेर शहरातील व्यापाऱ्याला जाळ्यात अडकवून बदनामी करण्याच्या धमक्या देवून ५ कोटी रुपये महिलेने सदर पुरुषाला उसनवार दिल्याचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणी घेताना रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्याने आज महिलेस न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पोलीसांनी न्यायालयात सदर महिलेच्या घराची झाडाझडती घ्यायची आहे तसेच सदर महिलेने केलेला करायचा असून पैसे दिल्याचे पुरावे तसेच सदर महिलेच्या घरामध्ये काही अजून मोबाईल किंवा इतरत्र पुरावे सापडतात का ? तसेच या मायाजालात व या महिलेचे व्हिडिओ काढणारा तिसरा कोण आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर पोलीस कस्टडीची मागणी केली होती. पोलिसांनी सदर महिलेला न्यायालयात नेण्यापूर्वी येथील तहसील कार्यालयात चाप्टर केस संदर्भात हजर केले होते. चाप्टर केस मध्ये सदर महिले कडून एक लाख रुपयेचा बॉण्ड करून घेतलेला असून चॅप्टर केस मधील नियम व अटी चे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासंदर्भात तपासी अधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलिसांनी या महिलेच्या प्रकरणात अडकलेल्या नागरिकांनी पोलीस पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आत्तापर्यंत तीन जण रावेर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी आपली आपबीती सांगितली ती पोलिसांनी गोपनीय ठेवलेली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांनी सांगितले.