Saturday, April 19, 2025
Homeजळगावज्येष्ठ नागरिकांनी यावल शहरात श्रीराम पालखी,शोभायात्रा काढून नववर्षाचे मोठ्या आनंदात स्वागत केले.

ज्येष्ठ नागरिकांनी यावल शहरात श्रीराम पालखी,शोभायात्रा काढून नववर्षाचे मोठ्या आनंदात स्वागत केले.

ज्येष्ठ नागरिकांनी यावल शहरात श्रीराम पालखी,शोभायात्रा काढून नववर्षाचे मोठ्या आनंदात स्वागत केले.

यावल दि.३०     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.   यावल शहरातील श्री महर्षी ज्येष्ठ नागरिक मंडळाने श्री रामाची भव्य पालखी सजवून संपूर्ण यावल शहरातून नववर्षाचे मोठ्या आनंदात स्वागत केले.
येथील श्रीव्यास व श्रीराम मंदिरातून गुढीपाडव्या निमित्त नवीन वर्षाचे श्रीरामाची पालखी शहरातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.श्री.महर्षी व्यास जेष्ठ नागरिक मंडळ यावल यांचे तर्फे सदर शोभायात्रेचे दरवर्षीप्रमाणे नियोजन करण्यात आले होते.सजावट
करण्यात आलेल्या पालखीत श्रीरामाचे प्रतिमेचे पूजन श्री नामदेव बारी परिवार यांच्या हस्ते श्री भुवन महाराज यांनी मंत्रोच्चार म्हणत पौरोहित्य केले.
यावेळेस श्रीराम मंदिरात सुध्दा विद्युत रोषणाई करण्यात आली होती.सकाळी ठीक ८ वाजता शोभायात्रेला पालखी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीत सुरूवातीला अट्रावल येथील भजनी मंडळ तसेच यावल येथील महिला भजनी मंडल यांनी श्रीरामाचे भक्ती गीताचे लक्षवेधी गायन केले,मिरवणुक रस्त्यावर आजूबाजूला असलेल्या रहिवाशांकडून सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या.रस्त्याने ठिकठिकाणी महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या आनंदात,भक्ती भावाने श्रीरामाचे पूजन आरती म्हणत केले.रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.मिरवणूकी दरम्यान नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन तीन ठीकाणी चहापानाची व्यवस्था केली होती.श्री व्यास मंदिरापासून सूरू झालेली शोभायात्रा पारंपारिक मार्गाने काढण्यात आली. येथील मोठा महादेव मंदिरात समारोप करण्यात आला.शेवट पर्यंत भाविकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.सदर शोभायात्रे करिता जेष्ठ नागरिक मंडळातील सभासदांनी परीश्रम घेऊन सहकार्य केले.शोभायात्रा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्वांचेच आभार मानण्यात आले. ज्येष्ठ नागरिक तथा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख,रमेश बोंडे,झोपे नाना,पंडित अप्पा गुरव,सुरेश नेटके,भागवत ढाके,
अरूण चोधरी, बंगले सर ,
ई. ज्येष्ठ नागरिकांनी विषेश परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या