यावल येथील श्रीमहर्षी व्यास व श्रीराम मंदिरात रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
यावल दि.६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील हरिता,सरिता उर्फ हडकाई खडकाई नदीच्या संगमावर असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळेस भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.सदर सोहळ्याचे आयोजन व पौरोहित्य मंदिराचे पुजारी भुवन महाराज व भुषण महाराज यांनी केले.सदर कार्यक्रमास बाल कीर्तनकार संचित कोळी यांनी त्यांच्या साथीदारासह हजर राहून श्रीरामाचे जन्मोत्सव विषयी प्रवचन करून श्रोत्यांना माहीती दिली.ठीक १२ वाजता श्रीराम यांचे जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात आरती करण्यात येऊन श्रीराम नामाचा जयघोष करण्यात येऊन सर्वांनी आरतीचा लाभ घेतला.यावेळेस बहुसंख्येने महिला भाविक तसेच पुरूष मंडळी उपस्थित होते.या प्रसंगी मंदिराची सजावट केळीचे खांब, फळाफुलांनी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती.श्रीराम जन्मोत्सव नंतर श्री.परमेश्वर महाराज,आळंदी यांनी थोडक्यात श्रीरामाचा चारित्र्याबद्दल व श्री व्यास महाराजांविषयी प्रवचन करून या स्थळाचा महिमा सांगितला.यावेळी ईतर भजनांचा कार्यक्रम होऊन भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.यावेळेस कार्यक्रमास रमेश बोंडे,गुरव अप्पा, अशोक बारी,अशोक चव्हाण, भागवत ढाके,उपेंद्र फालक, इ.सह भाविक उपस्थित होते.