राजोरा येथील श्री विठ्ठल मंदिरात शिवपुराण कथा सप्ताह प्रारंभ.
यावल दि.७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील राजोरा येथे
सालाबाद प्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या कृपेने व
वैराग्य वासी हभप झेंडूजी महाराज बेळीकर गुरुपरंपरेचा व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने शिवपुराण कथेचे,किर्तन सप्ताहाचे दि.७ एप्रिल २०२५ ते दि १४ एप्रिल २०२५ कालावधीत आयोजन केलेले आहे.सदर शिवपुराण कथेचे व्यासपीठ प्रवक्ते डालेन्द्र बुवा असोदेकर निरूपण करीत आहेत .
कलश पूजन व ग्रंथ पूजन नरेंद्र महाजन व सौ.शशिकला महाजन यांच्या हस्ते करून कथेला सुरुवात झाली.दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी ५ ते ७ काकड आरती,श्री विष्णू सहस्त्रनाम,शिवपुराण कथेचे पारायण सकाळी ८ ते २१ व दुपारी २ ते ५ या वेळेत होईल, व हरिकीर्तन दररोज रात्री ८ ते १० या वेळेत राहील.हरिनाम कीर्तनामध्ये दीपक बुवा शेळगावकर,ईश्वर बुवा जामठी कर,दुर्गादास बुवा खिर्डीकर,रितेश बुवा कुंडकर, धनराज बुवा अंजाळेकर,अनंत बुवा जोशी बिडकर,वेद विभूषण उद्धोध बुवा पैठणकर, व काल्याचे किर्तन ह भ प भरत बुवा बेळीकर हे करतील तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळातर्फे करण्यात आले आहे.