भारतीय जनता पार्टीने आमदार एकनाथराव खडसे यांचा तीव्र निषेध व्यक्त करीत यावल तहसीलदार यांना दिले निवेदन.
रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय इतिहासात खडसे यांचा पहिल्यांदा झाला निषेध.
यावल दि.८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या बद्दल आमदार एकनाथराव खडसे यांनी कुठलेच पुरावे नसताना राजकीय हव्याशा पोटी अश्लील भाषेत वक्तव्य केल्याने अतिशय निंदनीय आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असा तीव्र निषेध व्यक्त करीत भाजपा तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकार यांना लेखी निवेदन दिले.
भारतीय जनता पार्टीचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे बिनविरोध निवडून आलेले चेअरमन पांडुरंग दगडू सराफ,व्हाईस चेअरमन अतुल भागवत भालेराव,माजी चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे, संचालक तेजस धनंजय पाटील यांनी आज मंगळवार दि.८ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या बद्दल कुठल्याच पुरावे नसताना राजकीय व्यावसायकोटी आमदार एकनाथराव खडसे यांनी ज्या अश्लील भाषेत वक्तव्य केले ते अतिशय निंदणी आहे त्यामुळे आमच्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावले आहेत त्यांच्या या अशा खोट्या आरोपांबद्दल त्यांचे मानसिक संतुलन ठिकाणावर नसून वैमान्यातून नेहमी अशी कमरेखालील भाषा वापरून वक्तव्या करत असतात यातून त्यांचे मानसिक संतुलन ठिकाणावर नाही असे दिसून येते आम्ही अशा वक्तव्याबद्दल आमदार एकनाथराव खडसे यांचा तीव्र शब्दांनी शेत व्यक्त करतो आणि आम्ही आपणास सांगू इच्छितो की अशा खालच्या पातळीवर बोलणे बंद करून आमच्या नेत्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही भाजपाचे अध्यक्ष आंदोलन करू असे दिलेल्या निवेदनात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय इतिहासात पहिल्यांदाच आमदार एकनाथराव खडसे यांचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त झाल्याने राजकारण चांगलेच तापणार असल्याचे राजकारणात बोलले जात आहे. निवेदन देताना यावल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.