हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद : सरपंचासह भावाला बेदम मारहाण !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील चिंचोली या गावात हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून वढोदा सरपंच व त्यांचे भाऊ या दोघांना दोघांनी जबर मारहाण केली. व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कम देखील लांबवली. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोघांवर जळगावात उपचार सुरू असुन याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, यावल तालुक्यातील चिंचोली या गावात एका हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून राहुल शरद कोळी व अरुण सुखराम कोळी या दोघांनी वढोदा गावाचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे व त्यांचे बंधू डॉ. रविराज प्रभाकर सोनवणे या दोघांना जबर मारहाण केली व संदीप सोनवणे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवली व डॉ. रविराज सोनवणे यांच्या खिशातून दहा हजाराची रोकड देखील लांबवली. या मारहाणी मध्ये दोघे सोनवणे बंधू हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर जळगाव शहरात खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असुन या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात कैलास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाक र यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे.