यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल,सरदार वल्लभभाई पटेल स्कूल,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न.
यावल दि.१४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन या उपस्थित होत्या तसेच इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्य दिपाली धांडे मॅडम यादेखील उपस्थित होत्या.सौ. रंजना महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यांना विनम्रअभिवादन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे शिक्षिका श्रीमती संध्या पांडव यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व त्यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य कार्याविषयी माहिती सांगितली जे.टी.महाजन शाळेच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रियंका फेगडे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार सीमरन तडवी यांनी केले याप्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.आणि याच निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जयंती निमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वात प्रथम सौ.अर्चना महाजन मॅडम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग या वेळी उपस्थित मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार,डॉ.सुधीर कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,अनिल पाटील,दशरथ पाटील उपस्थित होते.
यावल नगरपरिषद संचलित,
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर होते,प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.के.पाटील सर यांनी केले यावेळी उपप्राचार्य ए.एस.
इंगळे सर,पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर सर,ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे सर,पी.एन. सोनवणे सर, एन. डी. नेवे सर,तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षिकेतर कर्मचारी बंधू – भगिनी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख श्रीमती इंदिरा रायसिंग मॅडम यांनी केले तसेच विद्यालयाचे शिक्षक ए.एस. सोनवणे सर व एस.आर.सोनवणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.के. पाटील सर यांनी मार्गदर्शन केले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे शिक्षक बी.डी.सुरवाडे सर यांनी विद्यालयाला गुलामगिरी, बाबासाहेब आपला बाप,शिवाजी महाराज आणि धम्म ,शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार ही पुस्तके भेट दिली,कार्यक्रमाचे अनुमोदन श्रीमती कविता कोलते मॅडम व आभार प्रदर्शन ए.एस. सोनवणे सर यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.