Saturday, April 19, 2025
Homeजळगावविठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू ; तब्बल आठ...

विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू ; तब्बल आठ तासानंतर मिळाला मृतदेह !

विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू ; तब्बल आठ तासानंतर मिळाला मृतदेह !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील मित्रांसोबत पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण अंघोळीसाठी चंद्रभागा नदीत उतरले. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दर्पण निलेश कोलते (वय १८, रा. न्हावी, ता. यावल) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झत्तला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. आठ तासानंतर तरुणाचा मृतदेह मिळून आला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.यावल तालुक्यातील न्हावी येथील दर्पण कोलते हा त्याचा मित्र मनोज रघुनाथ कापडे हे दोघे मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. रविवारी सकाळी ते दोघे स्नानासाठी चंद्रभागा नदीवर गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडू लागले. हा प्रकार तेथील काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या मनोज कापडे बाहेर काढून त्याला वाचविण्यात यश आले. मात्र दर्पण हा काही वेळातच पाण्यात बुडून बेपत्ता झाला. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली पोलीस प्रशासन व बचाव पथक दाखल झाले. त्यांच्याकडून बुडालेल्या तरूणाचा शोधकार्ययाला सुरुवात झाली.

पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या दर्पण कोलते याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु झाले. मात्र शोध घेवूनही त्याचा मृतदेह मिळून येत नव्हता. सुमारे आठ तासानंतर दर्पणचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या