‘उन्हाळी तीन दिवसीय संस्कारमाला’ शिबिराचे थोरगव्हाण येथे उद्घाटन – शिक्षण, संस्कार आणि आधुनिकतेचा संगम !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण यांच्या वतीने उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, शिस्त, मूल्यांची जाणीव व व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी “उन्हाळी संस्कारमाला” या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात शिक्षणाबरोबरच संस्कार व आधुनिकतेचा त्रिसूत्री संगम घडवण्याचा सांस्कृतिक समिती कडून हा प्रयत्न केला जात आहे.
पुष्प क्रमांक १ शिक्षणाची संस्कारमूल्ये”
शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सत्राचा विषय होता “शिक्षणाची संस्कारमूल्ये”. या विषयावर डॉ. जगदीश पाटील सर यांनी प्रभावी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची शिकवण दिली.
त्यांनी शिक्षणातून आत्मसात होणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्कार व नितीमुल्ये व्यक्तीमत्व विकासाचा भक्कम पाया आहे . आई वडिल गुरुजनांचे सांगणे ऐका .सुजान नागरीक व्हा असे आवाहन केले आहे.त्यामुळेच कुटुंब , गाव , राज्य , देश निकोप प्रगती साध्य करू शकेल जगात शांतता नांदेल असे मत त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री ए. पी. बाऊस्कर सर शाळेचे माजी मुख्याध्यापक होते, प्रास्ताविक श्री डी. के. पाटील सर, तर वक्त्यांचा परिचय श्री एम. के. पाटील सर यांनी करून दिला .प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्री रमेशभाऊ इंगळे (तासखेडा), जि.प शाळा . शालेय समिती सदस्य श्री लक्ष्मणभाऊ कोळी (तासखेडा) आणि रावेरचे शिक्षणाधिकारी श्री विलास कोळी, श्री दिलीप पाटील, श्री नानाभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.श्री विलास कोळी सर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम “काळाची गरज” असल्याचे नमूद केले. परीक्षेनंतरची सुट्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणल्याबद्दल त्यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे .याप्रसंगी संचालक मधुकर कोल्हे , नंदकुमार चौधरी , रविंद्र चौधरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला . व पूर्ण वेळ उपस्थिती दिली .उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांचे दातृत्वातून शिबिरार्थी सहभागींना भोजनाची सेवा देण्यात आली होती .
पुष्प क्रमांक २ – “आजचे आधुनिक व बदलते शिक्षण”