रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेसोबत पाच जणांनी केला विनयभंग !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रस्त्यावर उभ्या असलेल्या ५४ वर्षीय महिलेसोबत वाद घालीत तिला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच यावेळी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, घटना १४ रोजी यावलल शहरात घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मेन रोड परिसरात ५४ वर्षीय महिला उभी असतांना त्याठिकाणी विष्णू टीकाराम पारधे, आकाश विष्णू पारधे, मंगलाबाई विष्णू पारधे, पूजा पारधे, शारदा विष्णू पारधे हे पाच जण त्याठिकाणी आले. त्यांनी महिलेशी वाद घालत त्यांनी या महिलेला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच अश्लील – शिवीगाळ केल्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.