वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या नरभक्षक बिबट्याला केले जेरबंद.
शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान.
यावल दि.१८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दोन वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन ठार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावल वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचाऱ्यांना यश प्राप्त झाल्याने शेतकरी नागरिकांमध्ये समाधानकारक आहे.
वन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नमूद केले आहे की,
यावल येथील बिबटया जेरबंद
यावल तालुक्यातील दि.१७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२:३० ते १:०० वाजेच्या सुमारास
मौजे डांभुर्णी शिवारातील प्रभाकर चौधरी यांचे मा.ग.क्र. ७४१ मध्ये शेतात मध्य रात्रीच्या सुमारास कु.
रत्ना सतीश ठेलारी वय ०२ ही तिच्या आई सोबत झोपलेली असतांना बिबटयाने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेवून ठार केले होते.गेल्या महिन्या भरात बिबटयाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना यावल तालुक्यात घडल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव जमीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल,समाधान पाटील यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम सुनिल भिलावे, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व स्वप्निल फटांगरे व यावल वनविभाग कर्मचारी यांच्या उपस्थितीत दि.१७ एप्रिल २०२५ रोजी रात्री चिमुरडीला ठार मारले होते त्या भागात चार
पिंजरे लावण्यांत आले.रविंद्र फालक,मानद वन्यजीव रक्षक जळगांव व अमन गुजर यांच्या
सहकार्याने डॉ.यश सागर, पशुवैदयकीय अधिकारी TTC Jalgaon व वनपाल गणेश गवळी ( शुटर ) यांना पिंज-यात बसविण्यांत आले. रात्री ९:०० वाजेच्या सुमारास त्या भागात बिबटया पोहोचला. वनपाल
गणेश गवळी (शुटर) यांनी बिबटयावर अचुक नेम साधत बेशुध्दीचे इंजेक्शन मारले नंतर काही अंतरावर बिबटया गवतामध्ये
बेशुध्द झाला. त्याचा Thermal Drone च्या सहय्याने शोध घेवून लागलीच त्या बिबटयाला पिंज-यात जेरबंद करण्यांत आले.सदर बिबट्याला पुढील वैदयकीय चाचण्याअंती त्याला नागपुर येथे
पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे.
अथक परिश्रमानंतर बिबटयाला जेरबंद करण्यांत वन विभागाला यश आले,दरम्यान अशा घटना
जिथे घडतात तेथे नागरीकांचे सहकार्य खूप महत्वाचे असते. नागरीकांनी कुठलाही अडथळा
निर्माण न करता वनविभागाला त्यांचे काम करू दिल्यास वन्य प्राण्याला जेरबंद करणे किंवा त्याचा मागोवा घेणे लवकर शक्य होते. ” समाधान पाटील ( सहाय्यक वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव ) असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नमूद करण्यात आले आहे.