मुलीला मारल्याचा जाब विचारल्याने परिवाराला बेदम मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मेडिकलवर औषध घेण्यासाठी जात असलेल्या मुलीला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महेंद्र दिलीप सोनवणे (वय ३५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जमावाने बेदम मारहाण झाल्याची घटना दि. १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ममुराबाद गावात घडली. याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, ममुराबाद येथे महेंद्र सोनवणे यांची पुतणी दि. १६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मेडिकलवर जात होती. रस्त्यात किसन भानुदास सोनवणे याने त्या मुलीला शिवीगाळ करून चापटा बुक्क्याने मारहाण केली. मारहाणीचा जाब विचारण्यासाठी महेंद्र सोनवणेसह त्यांचे नातेवाईक किसन सोनवणे यांच्या घरी गेले. यावेळी ११ जणांनी सोनवणे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली, तसेच शिवीगाळ करीत जिवे मारण्याची देखील धमकी दिली. यावेळी महेंद्र सोनवणे यांच्या हातावर आणि कानाला धारदार वस्तूने मारून जखमी केले. मारहाणीनंतर महेंद्र सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार किसन भानुदास सोनवणे, बुद्धभूषण भानुदास सोनवणे, भानुदास देवीदास सोनवणे, संजय दोधू सोनवणे, नरेंद्र भावराव सोनवणे, स्वप्निल भावराव सोनवणे, संगीताबाई भानुदास सोनवणे, कपबाई देवीदास सोनवणे, साधनाबाई संजय सोनवणे, लताबाई भावराव सोनवणे याच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकों प्रकाश चिंचोरे करीत आहेत