शिवसेनेतर्फे पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेध
-प्रांतांना दिले निषेधाचे निवेदन; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणला परिसर
भुसावळ – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी काल मंगळवार रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड बेछूट गोडीबारामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवारी तीव्र निषेध करून प्रांत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी “पाकिस्तान मुर्दाबाद” “दहशतवादी संघटनेचा जाहीर निषेध” अशा विविध घोषणा देऊन परिसर दिनांक सोडला. प्राण कार्यालयाबाहेर पाकिस्तानचा ध्वज असलेले पोस्टर जाळण्यात आले.
प्राण कार्यालयात दिलेल्या नमूद करण्यात आले आहे की, जम्मू काश्मीर मधील पहेलगाम या ठिकाणी भारतीय पर्यटक पिण्यासाठी गेले असता. पोलिसांच्या गणेशात लपून बसलेले दहशतवादी यांनी बेछूट भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा इतर इतर राज्यातील असे एकूण 28 पर्यटक मृत्युमुखी पडले. या सर्वाना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून ज्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांना देखील भारतीय सैन्यातील वीर जवानांनी शोधून त्यांना ठार करावे अशी मागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यावेळी निवेदन देताना भुसावळ शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष माळी, महिला तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक हमीद भाई, शिवसेना उपशहर संघटक सोनी ठाकूर, युवा सेना युवाधिकारी पवन भोळे, भुसावळ शहर संघटक मयूर सुरवाडे, शिवसेना महिला समाजसेविका दिपाली बराटे, शिवसैनिक दीपक धांडे, सौरभ पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.