भुसावळ कबड्डी प्रीमियर लीग : गणराय टायटन्स संघ अजिंक्य,जय गणेश चॅम्पियन्स उपविजेते !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 27 ते 29 एप्रिल दरम्यान भुसावळ कबड्डी प्रीमियर लीगच्या आयोजन करण्यात आले होते.
29 रोजी या लीगचा चा अंतिम सामना ‘ गणराज टायटन्स आणि जय गणेश चॅम्पियन ‘ या संघांमध्ये झाला. या रंगतदार सामन्यात ‘ गणराज टायटन्स ‘ हा संघ विजयी झाला.

विजेत्या संघाला गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर चे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षिस आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.तर द्वितीय बक्षीस उपविजेत्या संघ जय गणेश चॅम्पियन्स ला माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी व तृतीय बक्षीस हिंदुसभा जिमखाना संघास पिंटूभाऊ कोठारी यांच्याहस्ते देण्यात आले.यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माझी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक तथा साईसेवक पिंटू भाऊ कोठारी, माजी नगरसेवक ॲड. बोधराज चौधरी, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोनू मांडे, बाळा मोरे, गणेश फेगडे, नितीन बरडे,सुनील राणे, बी . एन.पाटील,महेश बुटी,मुकुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. अंतिम सामन्यापूर्वी मंचावर उपस्थितं मान्यवरांचा परिचय दोन्ही संघातील खेळाडूंशी होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच पंचांशीसुद्धा परिचय झाला.
या स्पर्धेत प्रथम ,द्वितीय,तृतीय ,चतुर्थ अशा रोख बक्षीस आणि ट्रॉफीसह बेस्ट रायडर, बेस्ट पकड, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अशा तिघांना सायकल पारितोषिक देण्यात आले.यावेळी मान्यवरांनी भुसावळ कबड्डी लीगच्या आयोजकांशी संवाद साधला. या स्पर्धेसाठी डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या टीमचे सहकार्य खेळाडूंना लाभले. पंच म्हणून हरीश शेळके,विशाल सोनवणे, दीपक बनसोड, नयनसागर मणी,नम्रता गुरव,गजानन पाटील, रितेश तायडे,कमलेश पाटील यांनी काम पाहिले.या लीग चे आयोजन मुकुल शिंदे,रोहित श्रीवास्तव, आनंद तांबे,गोकुळ पाटील,महेश सावकारे,सचिन राजपूत,असीम तडवी,नितीन परदेशी,सार्थक बोके,सौरभ देठे,रोहन बरडे,अक्षय शिंदे,पीयुष शर्मा,धवल कोलते ,यश मोरे,हर्षल मोरे,दर्शन चिंचोले यांनी केले.