वादळग्रस्तांना त्वरीत मदत मिळण्यासाठी पंचनामे करा
शिवसेना शिंदे गटाच्या मही ला जिल्हाध्यक्ष नंदाताई निकम यांची मागणी भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ येथे दि. 06/05/2025 रोजी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे शिवपुर कन्हाळा रोड गोकुळ नगर भागातील रहिवासी राजू वसंत जाधव या व्यक्तीचे घराचे अतोनात नुकसान झाले.
सदर व्यक्तीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या घराचे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून सदर व्यक्तीस लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी असे निवेदन शिवसेना (शिंदे गट )महिला जिल्हाध्यक्षा सौ. नंदाताई प्रकाश निकम यांचे वतीने तलाठी भुसावळ यांना देण्यात आले आहे .

या प्रसंगी भुसावळ शिवसेना महिला शहराध्यक्षा सौ. दिपाली बऱ्हाटे, शिवसेना भुसावळ तालुकाप्रमुख सौ. वर्षा तल्लारे, भुसावळ शहराध्यक्ष पवन नाले, तसेच सौ. कल्पना बुंदेले, प्रमिला आडाळकर, विलास कोरटकर सौरभ घोसले,सुनंदा बघाडे, पूजा पाटील, स्वाती भंगाळे, वैशाली पाटील आशा महाजन, ज्योती तायडे, अमिता भैसारे, वैशाली कबाडे सविता चौधरी, लक्ष्मी घोसले, मंगला महाजन, कल्पना कोळी, मनीषा खडसे, छाया चौधरी, कविता पाटील ई. शिवसैनिक उपस्थित होते.