Sunday, July 20, 2025
Homeजळगावभोईवाडा परिसरात जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी ; माजी नगरसेवक पुत्र जखमी!

भोईवाडा परिसरात जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी ; माजी नगरसेवक पुत्र जखमी!

भोईवाडा परिसरात जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी ; माजी नगरसेवक पुत्र जखमी!

बोदवड खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील भोईवाडा परिसरात १७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराशेजारी जागेच्या मोजणीवरून वाद झाला. यातून दोन गटात हाणामारी झाली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांच्या घराशेजारील नमदाबाई एकनाथ भोई या दोन कुटुंबांमध्ये हा वाद झाला. फिर्यादी नर्मदाबाई भोई यांनी नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांचा मुलगा नितीन रमेश चव्हाण व सचिन रमेश चव्हाण तसेच रमेश नामदेव चव्हाण, सुरेश नामदेव चव्हाण, दीपक सुरेश चव्हाण, सागर सुरेश चव्हाण यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार दिली. तर या घटनेत माजी नगरसेवक व नगरसेविकेचा मुलगा नितीन रमेश चव्हाण यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. यामुळे दुसऱ्या गटाची फिर्याद नोंदविणे बाकी आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या