मुक्ताईनगर येथे अंगणवाडी सेविकेच्या तक्रारीवरून विधी संघर्षग्रस्त बालकाकडून धान्य व भांडी हस्तगत
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पोलीस स्टेशन येथे दाखल एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.
दिनांक 14 जुलै 2025 रोजी पदमाबाई पंडीत पाटील वय 64 व्यवसाय अंगणवाडी सेविका, रा. आठवडे बाजार, जुनेगाव, ता. मुक्ताईनगर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी नुसार त्यांच्याकडून खालीलप्रमाणे धान्य ,भांडी व पुढीला साहित्य चोरीस गेले होते:
५२ किलो मुंगडाळ – किंमत अंदाजे ₹52,00 , दिडशे किलो तांदूळ – १२०० , शंभर किलो वाटाणा – किमंत ७००० ‘ तेहतीस किलो मसूर डाळ – किमत २६४०
चोवीस पाऊच सोयाबीन तेल किमत ३१२० रुपये
कुकर व भांडी साहित्य किमत ७०० रुपये
या सर्व साहित्याची एकूण अंदाजे किंमत ₹19,860 इतकी आहे. तपासामध्ये उघडकीस आले की, वरील सर्व साहित्य विधी संघर्षग्रस्त बालकाकडून हस्तगत करण्यात आले आहे.
सदर गुन्हा गु.र.नं. 224/2025 भा.दं.वि. कलम 305 (a), 331 (3), 331 4 प्रमाणे दाखल झाल्यानंतर केवळ ३ दिवसांत पोलीस निरीक्षक मा. श्री. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. 2867 महेंद्र शांताराम सुरवाडे आणि पो.कॉ. 1913 श्रावण भिल यांनी तपास करत ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.