Sunday, July 20, 2025
Homeजळगावमदत करण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिपाईची ४८ हजारात फसवणूक !

मदत करण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिपाईची ४८ हजारात फसवणूक !

मदत करण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त शिपाईची ४८ हजारात फसवणूक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून एका जणाने एटीएम कार्ड बदलवून सुधाकर पंडितराव सुरसे (६४, रा. शाहूनगर) यांची ४८ हजार ३०० रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार १२ जुलै रोजी गणपती मंदिरासमोरील एटीएममध्ये घडला. या प्रकरणी १८ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नूतन मराठा महाविद्यालयातून निवृत्त झालेले सुधाकर सुरसे हे १२ जुलै रोजी त्यांच्या पत्नीचे एटीएम कार्ड घेऊन चित्रा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गणपती मंदिरासमोरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली; मात्र पैसे निघाले नाही. त्यामुळे तेथे बाजूला उभ्या असलेल्या एका तरुणाने शेजारील मशीनमधून पैसे काढा, असे सांगितले. मात्र त्या मशीनमधून पैसे काढता येत नसल्याचे सेवानिवृत्ताने सांगितले असता तरुणाने मदत करण्याची तयारी दाखविली. त्यासाठी त्याने निवृत्ताजवळील कार्ड घेऊन ते मशीनमध्ये टाकले, मात्र पैसे निघत नसल्याचे सांगत त्याने हातचलाखीने कार्ड बदलविले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या