Sunday, July 20, 2025
Homeजळगावखळबळ : शहरातील सुवर्ण व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई...

खळबळ : शहरातील सुवर्ण व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई !

खळबळ : शहरातील सुवर्ण व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील एका बंगाली सुवर्ण व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याला दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडवले. त्याला दुचाकीवरुन सोबत पोलीस ठाण्यात घेवून जात त्याच्याकडून लाखो रुपये घेणारे शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोकॉ विक्की इंगळे व कमलेश पाटील या दोघ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील एका भागात राहणारा बंगाली सुवर्ण व्यावसायीक काही दिवसांपुर्वी सोने व काही रक्कम सोबत घेऊन जात होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडे चौकाकडे जात असतांना, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करीत पांडे चौकात पकडले. तसेच त्याच्याकडे असलेले सोने हे अवैध असल्याचे सांगत त्याला दोघांनी दुचाकीवर बसवून शनिपेठ पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ही रक्कम संबंधित व्यापाऱ्यास परत मिळाली. मात्र या विषयी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार करण्यात आली होती. व्यापाऱ्याला त्याची रक्कम परत मिळाली मात्र हा विषय गंभीर असल्याने त्याची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी पैसे घेणाऱ्या दोघ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे तातडीने आदेश काढले. यामध्ये कमलेश पाटील यांची मारवड तर विक्की इंगळे यांची पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या