जय गणेश फाऊंडेशन निस्पृहपणे कार्य करणारी संस्था- रमण भोळे यांचे प्रतिपादन
सर्वसाधारण सभेत कर्तृत्ववान व्यक्तींचा झाला सन्मान.
भुसावळ- खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ शहरातील जय गणेश फाऊंडेशन ह्या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार संपन्न झाली . याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुकाराम आटाळे आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा प्रा. डॉ.सुधा खराटे आदी उपस्थित होते.
यावेळी भुसावळ शहरातील विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या दहा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे .
सत्काराला उत्तर देतांना क्रीडाशिक्षक रमण भोळे यांनी जय गणेश फाऊंडेशन च्या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रा. सुधा खराटे यांनीही जय गणेश फाउंडेशन ही सर्व समावेक्षक कार्य करणारी संस्था असून त्यांचा नागरीकोना चांगला उपयोग होत आहे .
यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव तुकाराम आटाळे यांनी केले,
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र यावलकर यांनी पुढील नियोजित उपक्रमांची माहिती दिली. ‘सन्मान कर्तृत्वाचा’ अंतर्गत सन्मान करण्यात आलेल्या व्यक्तींचा परिचय फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन हर्षल वानखेडे याने केले.
सभा यशस्वीततेसाठी राहुल भावसेकर, तुषार झांबरे,प्रवीण पाटील, निलेश कोलते, नचिकेत यावलकर, मनोज चौधरी, विशाल आहुजा,दगडू पाटील आदींनी परिश्रम घेतले .
या कार्यक्रमात अुत्कृष्ठ कार्य करणारे रमण भोळे,विश्वनाथ पाटील, बाळकृष्ण झांबरे,विरेंद्र पाटील,नुपूर भालेराव,राजेंद्र जावळे, अजय आंबेकर, सौ.प्रिया पाटील, ज्ञानेश धांडे, विरेंद्र फिरके आदींचा सत्कार करण्यात आला आहे .