Sunday, July 20, 2025
Homeगुन्हामुजोर,मद्यधुंद सहायक कृषी अधिकाऱ्याने माहिती अधिकार कार्यकर्त्यास दिली धमकी.

मुजोर,मद्यधुंद सहायक कृषी अधिकाऱ्याने माहिती अधिकार कार्यकर्त्यास दिली धमकी.

मुजोर,मद्यधुंद सहायक कृषी अधिकाऱ्याने माहिती अधिकार कार्यकर्त्यास दिली धमकी.

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी –                कृषी खात्यात एका मुजोर झालेल्या सहायक कृषी अधिका-याने मद्याच्या नशेत चार माणसे पाठवतो तुम्ही जिथे असाल तिथून पकडून आणतो अशी फोनवर धमकी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांना दिल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
धमकीचा तो कॉल एरंडोल येथील कृषी अधिकारी चंद्रकांत सैंदाणे यांचा असल्याचे उघड झाले आहे. ही संताप जनक घटना १७ जुलैच्या रात्री समोर आल्याने समाजात आणि प्रसिद्धी माध्यमात सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे. दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केल्याचे समजताच या मद्यधुंद कृषी अधिका-याची नशा तत्काळ उतरली आहे.फोनवर वारंवार आपले पद सांगून पदाचा गैरवापर करत धमकी दिल्यामुळे त्या सहाय्यक कृषी अधिकारी खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून हा सहाय्यक कृषी अधिकारी कार्यालयीन वेळेत सुद्धा मध्य प्राशन करून येत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की,एरंडोल येथील कृषी अधिकारी चंद्रकांत सैंदाणे हे त्यांच्या काही मित्रांसोबत एरंडोल येथील एका बियरबार मधे मद्यपान करण्यास गेले होते.मद्यपानाच्या दरम्यान ते वाशरुम मधे गेले होते. वाशरुम मधून बाहेर येताच त्यांच्या सोबत बसलेल्या मित्राने त्यांना सांगितले की एक जण बियाण्यांची चोरी करतो.मी तुमचे त्याच्याशी मोबाईलवर बोलणे करुन देतो असे म्हणत सोबत बसलेल्या त्या व्यक्तीने सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना कॉल लावला. पलीकडून बोलणारी व्यक्ती ही बियाणे चोरी संदर्भातील असल्याचा सैंदाणे यांचा समज झाला.कोणतीही खात्री न करता त्यांनी सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्याशी अतिशय उद्धटपणाने अरेरावीची भाषा बोलत तुम्ही कुठे आहात? तुम्हाला पकडण्यासाठी चार माणसे पाठवतो.तुम्ही जिथे असाल तिथून ते तुम्हाला पकडून आणतील.तुमचे काय कामकाज आहे ते बघतो अशी उद्धट ऊर्वटपणाची भाषा कृषी अधिकारी सैंदाने यांनी गुप्ता यांच्याशी बोलताना केली.हा बोलण्याचा काय प्रकार आहे याचा कोणताही उलगडा होत नसल्याने गुप्ता कमी अधिक प्रमाणात संतापले.मात्र पलीकडून बोलणारे कृषी अधिकारी काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. मद्याच्या नशेत ते चार माणसे पाठवतो,मी कृषी अधिकारी सैंदाणे बोलतो आहे,तुम्ही जिल्हापेठ पोलिस स्टेशनला या,तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात या वगैरे वगैरे…….. बोलत होते.अखेर दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन जाऊन घटनाक्रम सांगून आपल्यावर बितलेला प्रसंग संबंधीत ठाणे अंमलदाराकडे कथन करत गुन्हा दाखल करण्यास सांगितले.मात्र पोलिसांनी या गंभीर धमकीच्या घटनेबाबत केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला.त्यामुळे या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल होण्यासह विविध कायदेशीर मागण्यांची गुप्ता यांनी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दिली.
चुकीच्या अदखलपात्र गुन्ह्याची नोंद रद्द करून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 351 (2) आणि 351 (5) (गुन्हेगारी धमकी) याखाली एफआयआर दाखल करावी.आरोपीच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची BNS कलम 176 नुसार फॉरेन्सिक तपासणी करावी. आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमुद केली आहे.या मागण्यांना त्यांनी कायदेशीर आधाराची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची जोड दिली आहे.ललिता कुमारी (2013), विकास अग्रवाल (2002), आणि नीरजा सराफ (1994) यांच्या निकालांनुसार, सरकारी अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून धमकी दिल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र पोलीस परिपत्रक CID/01/2014 आणि CB/02/2023 नुसार, धमकीच्या प्रकरणात त्वरित संज्ञेय गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे देखील गुप्ता यांनी म्हटले आहे.पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याऐवजी दखल केलेला अदखलपात्र गुन्हा सुप्रीम कोर्टाच्या ललिता कुमारी बनाम उत्तर प्रदेश सरकार (2013, AIR 2014 SC 187) या निर्णयाच्या विरोधात असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. या निर्णयानुसार, संज्ञेय गुन्ह्याची माहिती मिळाल्यास FIR दाखल करणे बंधनकारक आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी आपल्या हक्कासाठी केलेला खटाटोप बघता मद्यधुंद कृषी अधिकारी सैंदाणे यांची नशा खाडकन उतरली. आपण मित्रांसोबत मद्यपानात सहभागी झाल्यानंतर बोलून गेल्याने माफी मागतो असे कृषी अधिकारी सैंदाणे यांनी गुप्ता यांना विनवणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या