कर्कश आवाज अन् वाहतूक कोंडी : ध्वनिवर्धकांवर थिरकली तरुणाई
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाला दहांव्या दिवशी मंगळवार (ता. १७ )अनंत गणेश चतुर्थीला निरोप देण्यात आला. सुमारेसहा ते सात तास मिरवणूक शहरांत चालली. ध्वनिवर्धकांच्या मराठी- हिंदी गाण्यांवर तरुणाई बेधुंद थिरकली. काही मंडळाच्या ध्वनिवर्धकांच्या आवाजाने नागरिकांचा थरकाप उडाला. या मिरवणुकीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. मिरवणूक मात्र शांततेत पार पडली.
भुसावळ शहरांत दिड दिवस, सातवा, नवव्या आणि अंनत गणेश चतूर्थीला दहाव्यां दिवशी सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मंगळवार ( ता. १७ ) सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. सात वाजता जवाहर डेअरी, सराफ बाजार, बाजारपेठ पोलिस स्टेशन पर्यत मंडळांची रांग लागली होती. सर्वच मंडळांनी ध्वनिवर्धक लावला होता. काही मंडळांचे पारंपरिक ढोल-ताशा पथकही होते. ध्वनिवर्धकावर तरुणाई बेधुंद होत नाचत होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. सार्वजनिक गणेश मंडळांनी डोळयांचे पारणे फिटतील असे विविध आकर्षक देखावे सादर केले होते. तर काहि मंडळांनी जिवंत व वर्तमानातील देखावे सुद्धा सादर केले होते. मंडळाच्या मिरवणुकीत मर्दानी खेळांचाही समावेश होता.
मंडळांकडून फटाक्यांची सुध्दा ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. काही मंडळाच्या ध्वनिवर्धकांचा आवाज अतिशय कर्कश आवाज होता. या आवाजाने नागरिकांचा अक्षरशः थरकाप उडत होता. जमिनीला हादरे बसत होते. कानात कापसाचे बोळे घालण्याची वेळ नागरिकांवर आली होती.मिरवणुकीमुळे ठीकठिकाणी रस्ते बंद केल्याने नागरीकांची तारांबळ सुद्धा झाली. दोन्हीकडील वाहतूक एकाच बाजूने सुरू होती. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी आठ वाजेपासुन लहान आणि घरगुती बाप्पाचे तापी नदीपात्रात शांततेने विसर्जन करण्यात आले. याकरिता बाजारपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत १६ आणि अतिरीक्तबंदोबस्त २८ पोलिस कर्मचारी अधिकारी गृहरक्षक दलाचे ५० कर्मचारी तर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत १९गृहरक्षक दलाचे जवान ३३ कर्मचारी असा दोन्ही पोलिस ठाणे मिळून १४६ पोलिस अधिकारी कर्मचारी गृहरक्षक दलाचा बंदोबस्त अतिरीक्त पोलिस दलाच्या तूकडया असा शहरांत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तर हिंदू हाऊसींग सोसायटी, साईजिवन सुपर शॉपीचे संचालक नगरसेवक निर्मल ( पिंटू ) कोठारी यांचेकडून महाप्रसाद म्हणुन सकाळी ८ वाजे पासुन रात्री १२पर्यत गणेशभक्तांच्या सेवेकरीता अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. रात्री उशीरापर्यत बाप्पाचे विसर्जन सुरू होते. भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डमाळे.वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भुसावळ नगर परीषदेचे अधिकारी कर्मचारी गणेशभक्तांची सेवा करण्यांत गुंतले होते.यंदाचा गणेश विसर्जन सोहळा हा निर्विघ्न पार पडू दे अशी भावना भुसावळचे प्रांत आधिकारी जितेंद्र पाटिल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, राजेंद्र फातले, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी व्यक्त केली.