Saturday, March 28, 2026
Homeगुन्हामोठी कारवाई : नाका बंदीत तब्बल ३९ किलो ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त!

मोठी कारवाई : नाका बंदीत तब्बल ३९ किलो ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त!

मोठी कारवाई : नाका बंदीत तब्बल ३९ किलो ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कन्नड-चाळीसगाव महामार्गावर कन्नड घाटाखाली नाका बंदी करत असताना मोठी कारवाई करत महामार्ग पोलिसांनी सुमारे ३९ किलो अमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले असून, त्याची अंदाजे किंमत ६० कोटी रुपये असल्याचे समजते. ही कारवाई पीएसआय शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अमली पदार्थ असलेली ब्रेझा गाडी बेंगळुरूहून दिल्लीकडे जात असल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली. दि. २४ रोजी रात्री १० नंतर ही कारवाई सुरू होती. रात्री उशिरापर्यंत तपास व पंचनाम्याचे काम सुरू होते. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथक उपस्थित होते व सविस्तर तपासणी पोलिसांकडून केली जात होती.पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, गाडीमधील व्यक्ती व ड्रग्ज पुरवठा साखळीबाबत तपशील घेतले जात आहेत. महामार्ग पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा पकडण्यात आल्याने संभाव्य समाजविघातक घडामोडी रोखल्या गेल्या आहेत, असे बोलले जात आहे. काही महिन्यांपुर्वीच जिल्ह्यात ड्रग्ज् व केटामाईनचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटले होते. त्यानंतर पुन्हा चाळीसगाव येथे ड्रग्ज्ची मोठी कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, शहर पोलिस निरीक्षक अमित मनेळ यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व तपास कार्याची पाहणी केली. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, ड्रग्ज तस्करीचा मोठा सुळसुळाट उघड झाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या