बांभोरी येथे जुन्या वादातून रिक्षा चालकाला चौघांकडून मारहाण; धरणगाव पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल
धरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी येथील सावली बियर बार वाईन शॉप जवळ एका रिक्षा चालकाला जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी शिवीगाळ करत लाकडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा दिलीप सपकाळे वय 42, रा. बांभोरी ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रिक्षा चालवून ते आपला उतरनिर्वाह करतात दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जुन्या भांडण्याच्या कारणावरून गावात राहणारे राजेंद्र श्यामराव सपकाळे, किशोर राजेंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे आणि प्रमोद रामदास नन्नवरे या चौघांनी सावली बिअरबार वाईन शॉप जवळ शिवीगाळ करून लाठीकाठीने त्यांच्या हाताला पायाला आणि डोक्यावर मारून करून त्यांना दुखापत केले. या संदर्भात शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण तांदळे हे करीत आहे.

