Monday, July 6, 2026
Homeगुन्हाभुसावळ एम आय डीसी मध्ये चोरी; २० हजारांचा माल लंपास

भुसावळ एम आय डीसी मध्ये चोरी; २० हजारांचा माल लंपास

भुसावळ एम आय डीसी मध्ये चोरी; २० हजारांचा माल लंपास

Oplus_131072

<img class

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील किन्ही एम आय डी सी परिसरात अज्ञात चोरट्यांनी कंपनी फोडून मौल्यवान साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात CCTNS गुरनं 04/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद शमाबेगम सैय्यद (वय ५०, व्यवसाय – घरकाम, रा. अयान रेसिडन्सी, ए विंग, चौथा मजला, प्लॉट नं. १३, खडका रोड, भुसावळ) यांनी दिली आहे. यांच्या मालकीची किन्ही MIDC प्लॉट नंबर F-48 येथील ‘शमजा प्लास्ट’ कंपनीमध्ये ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपासून ते दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली.
चोरट्यांनी कंपनीच्या वॉल कंपाउंडला तोडफोड करून आत प्रवेश केला व कंपनीतून १५ हजार रुपये किंमतीचे क्रॉम्पटन कंपनीचे २० HP क्षमतेचे पांढऱ्या व निळ्या रंगाचे दोन इलेक्ट्रिक मोटार तसेच ५ हजार रुपये किंमतीचे वागले कंपनीचे दोन स्टार्टर असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेत कंपनीच्या मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले आहे.
तालुका पोलिस ठाण्यात याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास स . फौ .भाग्यश्री चौधरी करीत आहेत. परिसरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या